Sunday, January 15, 2012

नातं...

नातं म्हणजे चांदण..
जसा रात्री पडणा-या चांदण्यात एकटा चंद्र दिसतो ना तस काही आपण असतो
इतके जवळ असुनही भरवसाचं कुठलच चांदण नसतं त्याच्यासाठी...
आणि हे चांदण म्हणजे आपण करत असलेल्या प्रवासात आपल्याला क्षणभराची..काही काळापुरती सोबत..
मग ते कुठलही असो आइ-बाप,भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीणी, प्रेयसी-बायको, मुलं-बाळं, आणि बरेच काही..
एका ठराविक वेळेपुरते ही आपल्याला या प्रवासात कंपनी देतात, आपल्या सोबत हसतात, रडतात, जगतात,
त्यांनाही आपला प्रवास असतो ..आपण फ़क्त ती सोबत एंजॉय करायची...सुख: दुख: वाटुन घ्यायचे..
जशी आपल्याला त्यांची गरज असते तशी त्यांनाही आपल्या सोबतीची गरज असते..
त्यात गुंतण, न गुंतण हे सर्वस्वी आपल्या हातात असतं,आपल्या म्हणण्यापेक्षा आपल्या मनाच्या हातात...!!

आज आहे उद्या नाही, कशाचाही भरवसा नसतो हे शापित सत्य आहे ..
आपलं इथ काही नसतं ना कुठली वस्तु, ना पैसा, ना कूठली माणसं...
मग कशाला उगाच या गोष्टींच ओझं घेउण फ़िरायचा हे माझं ते माझं, हा माझा तो माझा,
हे काहीच नसतं..इथं फ़क्त आपण असतो आपण..आपणच आपल्यासाठी जगायचं असतं...
अश्या गोष्टीत गुंतण्यापेक्षा समोरचा प्रत्येक क्षण, दिवस मजेत घालवायचा....
आणि हसत शेवटापर्यंतचा प्रवास करायचा...सोबतच्या असलेल्या चांदण्याबरोबर....

याच प्रवासाला जगणं आणि त्या चांदण्याला नातं म्हणतात...

No comments:

Post a Comment