श्री.विश्वनाथ नाटेकर एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व..
आता प्रसिद्ध ह्याच्यासाठी कि जगाच्या कुठ्ल्याही कोपर्यातजा ह्यांचे नातेवाईक भेटनारच
नाथाचे लग्न हि तर लकशात रहान्यासारखि गोष्ट होतिच पण त्याहिपेक्षा लकशात राहिला तो "राजापुरचा प्रवास"
कोनतिहि गोष्ट शेवट पर्यन्त करायचि नाहि हे काहि माझ्यासाठि नविन नव्ह्ते...राजापुरला जायचि तारिख मी लग्न ठरले तेव्हाच जाहिर करुन टाकलि होति.आता घरातल्या सगळ्यानि १ महिना आधि तिकिट काढले तरि आम्हाला अक्कल आलि नव्हती कि आपलि पण तिकिट काढलि पाहिजे आणि जेव्हा आम्हि झोपेतुन जागे झालो तेव्हा धावपळ करन्याशिवाय पर्याय नव्हता.सकाळि सकाळि डोळ्यासमोर काजवे चमकावे तसे माझ्या डोळ्यासमोर ST booking counter ते booking agent सगळे चमकत होते.
ह्या वेळेलाहि तिकिट मिळावि म्हनुन देवाला मी त्रास देतच होतो....आता ह्या शुल्लक कारणासाठि त्याला किति त्रास झाला हे त्यालाच माहित्...तरि असो..
पहिला फटका ST booking counterवर बसला आणि मला मान खालि घालुन परत यावे लागले.तसाच मी जवळ्च्याच बुकिंगवाल्या कडे गेलो त्याने एक ति़कीट आहे सांगितले पन ते होते वाशिवरुन म्हनजे घरापासुन दुरुन.जास्त चौकशा न करता
आमचा मोर्चा सरळ आम्हि Neeta Volvo कडे वळवला.१२००/- रुपये तिकिट सांगुन त्यानि तर हवाच काढुन टाकलि आणि वर "तुम्हि ठाण्यामधे बसलात आणि पनवेला जरि उतरलात तरि तेवढेच" असे पुणेरी भाषेत सांगितलेहि.Neeta Volvo वाल्याने सपशेल पराभव केल्यावर आम्हि परत त्याच बुकिंगवाल्या कडे परतलो.आता
शेवटचा ध्यास आणि श्वास हाच बुकिंगवाला होता आणि हे त्याला समजले आहे हे ही मला त्याच्या तोंडावरचे विजयी हास्यपाहुन समजुन चुकले.तिकिट फक्त ३५०/- ला होति.वा हा तर एक चमत्कार होता आणि ति पण ड्रायवरच्या बाजुचि..हे एकुन मला तर एकदम गुलाबपाणी शिंपडल्याचा भास झाला.एवढा आनंद झाला कि चक्क त्या क्षनाला मी त्या ड्रायवरच्या बाजुला पोचुन हवा खात असल्याचा भास मला होऊ लागले….लगेच तिकिट बूक केलि आणि फोनाफोनी करुन तिकिट मिळाल्याचि खबर सगळ्याना पोचति केलि.सर्वात पहिले घरी सांगितले कारन तिकिट लेट काढल्याबद्द्ल घरी चांगलेच कान ऊघडले होते.फक्त पाठिवर रट्टे पडायचे बाकि होते.
गाडी वाशीवरुन असल्यामुळे आमचि वरात ऑफिसवरुन निघनार होति.मी आणि माझि मोठालि बॅग ( जी दिवसभर ऑफिसमधे सगळ्यांच्या चर्चेचा विषय होति ) अशी आमचि जोडगोळि होति.आता Stop वर उभा राहुन मी माझ्या स्वपनातल्या गाडिचि वाट पहात होतो.शेवटी तासभर वाट बघुन आमचा रथ हजर झाला.आणि मला पहिला धक्का बसला.
गाडिचि Condition तशि बेताचिच होति.बॅग डिक्कीत टाकुन सीटवर गेलो माझी सीट हा मला बसलेला दुसरा धक्का.ती सीट बघुन खरच मला माझ्या बॅगचाच हेवा वाटायला लागला कारन डिक्की माझ्या सीटपेक्षा ऐसपैस होति.
Lock होत म्हणजे नेमके काय होते हे मला त्या Seat मधे बसल्यावर कळले.तेव्हा मला माझ्या बॅग चा अजुनच राग आला जी डिक्कीत आरामात बसलि होति
गाडित अपेक्षे पेक्शा जास्त लोक होते हे तर मला सकाळिच समजले.माझी Seat एकदम दरवाज्याच्या बाजुला होति.Left साईडला दरवाजा आणी right साईडला भले मोठे पत्र्याचे partition ह्या दोघांनमधे मी आता एका रात्रि पुरता अडकलो होतो हे नक्की आणि आता अशा परिस्थिथीमधे आमचि यात्रा सुरु झालि.
ड्रायवरच्या बाजुच्या Seat कशा प्रकाच्या असु शकतात ह्याचे प्रत्यंतरच आले होत आणी त्यात गाडित हवेचा मागमुस ही नव्हता.
गाडित घुसल्याबरोबर एका ग्रुहस्थाकडुन माझी चौकशी सुरु झालि (जायचे कुनाकडे राजापुरला,कशासाठी वैगेरे वैगेरे..).माझ्या प्रत्येक उत्तरावर त्यांचि चर्चा,टीपन्नी चालुच होति.
विश्वनाथचे नातेवाईक जगाच्या कुठ्ल्याहि कानाकोप-यात आहेत ह्या त्यानेच सांगितलेल्या ब्रह्म वाक्याचा प्रत्ययही मला ईथेच आला कारण भाऊंना म्हनजे विश्वनाथच्या बाबांना ते ग्रुहस्थ चांगल्याप्रकारे ओळ्खत होते आणी राजापुरला पोचल्यावर मला घरी पोचवायचि जबाबदारी हि अगदी मला न विचारता त्यानी त्यांच्या खान्द्यावर घेतलीहि.
आता हा बाजुचा दरवाजा दर १५ मिनिटानि ऊघडत होता आणि तो मला सतत आपटत होता.त्यातहि जर मधेच झोप लागलिच तर झोप लागायला आणि partition वर डोके आपटायला एकच वेळ व्हायचि.डोके आपटुन आपटुन एक छोटेशे टेंगुळहि डोक्याला आले होते आणि असा आमचा आपटाआपटीचा खेळ रात्रभर चालु होता अशा परीस्थितीच आमचे विमान शेवटी राजापुर बस स्टॅडवर एकदाचे ऊतरले आणी मी सुटकेचा श्वास सोडला.
असा हा प्रवास लकशात रहान्यासारखा होताच पण जास्त लकशात राहीले ते "तु काहि काळजि करु नकोस असे बोलनारे आणि ऊतरल्यावर रिक्शात बसऊन देनारे,नाव आठवत नसलेले ग्रुहस्थ"
"खरेच कोकनातले लोक नारळाप्रमाने बाहेरुन HArd पन आतुन एकदम soft असतात हे नक्की"
Monday, August 8, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment