ट्राफिक हवालदाराला "मामा" का बोलतात हे मला अजुन काहि कळलेले नाहि पन ट्राफिक हवालदार हा एक संशोधनाचा विषय आहे हे नक्की..मामाने कोनाला धरले कि १००/- गेले असे समजावे.आनि गाडिच्याबाबतीत ईतके पेपर मागनार कि आपल्याकडे त्यातला एक तरि नसनारच हे नक्कि.आजच्या Incident ने मामांबद्दल लिहायला भाग पडले.
मागल्या महिन्यात,नेहमिचा रस्ता अचानक No Entry मोड मधे गेला आणी माहिति नसल्यामुळे आमचि स्वारिपन तिथुनच निघालि आणि समोर मामाने धरला..थोडि विनवनि केल्यावर चक्क माला fine न मारता सोडला तेव्हा एकदम मामा बद्दल आपुलकि निर्माण झालि होति ति पुढ्ल्याच दिवशी त्याच मामाने fine जेव्हा केले तेव्हा संपलि .
अगदि कालचि गोष्ट
पावसाळयाचि चप्पल आनायला गेलो होतो आणि उगाच सिग्नल सुट्लेला असताना मामा आडवा आला आणि कारण काय तर मी १ sec.ने सिग्नल तोडला होता.एवढा accurate टाईम तर शाळेत पेपर लिहितानाहि पाळला नव्हता.मामांच्या नशिबाने माझ्याकडे त्यानी मागितलेला एकहि पेपर नव्हता.डोक्यावरचे हेल्मेट न काढ्ता मी मामांचि समजुत काढत होतो.पहिलि बोलि ३००/- ची लागलि.पावति फाडा.१००/- नोट देऊन काम होईना ऊलट मामाचा तोडफोड dialog एकावा लागला " सगल्या गोष्टि पॅष्याने होत नाहित.पावति फाडाविच लागनार".शेवटी कोर्टात उभे असल्या सारखे त्याने माझ्याकडुन "चुकुन तोडला सिग्नल असे बोला.." असे वदऊन घेतले आणि १००/- रुपायात जामीन मिळाला
आणि मामांवर लिहायला भाग पडलेला हा आजचा प्रसंग..
सकाळि सकाळि रोडवरुन जाताना बाजुला मामांचे टोळके आणि समोर मामा.मी खरेच काहि केले नव्ह्ते.सिग्नल तोड्ला नव्हता,No Entry मधे गाडि नव्हति.ह्यावेळी ही पेपर नव्हते पण ह्याना कोनि सांगितले ते काहि कळले नव्हते.ए़कदातर माझ्या मनात असे हि आले की हे माझीच गाडी शोधुन शोधुन पकडतात कि काय.शेवटी मामांचि ऑरडर आलि "त्या रिक्शाच्या मागे जायचे आहे.नो एंट्रिमधे घुसला आहे..." आणि माझ्या जिवात जिव आला
मी मुकाट गाडि वळवली.भल्यामोठ्या पोटाचा मामा माझ्या मागे आणि मी पुढे अशी आमचि स्वारि निघालि.
आता ह्या भल्यामोठ्या मला बसायला त्रास होतोय हे काहि मी त्याला सांगु शकत नव्हतो हे नक्की.
रिक्शावालातर एकदम ऊस्ताद होता.त्याने गल्लीबोल्यातुन सुस्साट वेगाने गाडि घालत होता..मामा नुसत्या लेफ्ट आणि राईटच्या ऑरडर देत होता आणि मी सुस्साट वेगाने गर्दीतुन वाट काढत होतो.मी अशी गाडी पळवत होतो की रिक्शावाल्याला पकडल्यावर मामाला मिळनार्या १००/- रुपायातली अर्धी वाटणी माझी असनार होती.मामासाहेब एकदम हक्काचि गाडी असल्यासारखे माझ्या गाडिचे पेट्रोल जाळत होते.साहेबांना एकतर रिक्शाचा नंबर माहीत नव्हता का तर रिक्शा दुर होता म्हणे.शेवटी एकदाची गाडी थांबवन्याचि ऑरडर आली.
गाडी वळवुन साहेबांना त्यांच्या टोळ्क्यात सोडले आणि मी धुम ठोकलि.आल्याआल्या पहीले सगल्या पेपरची XEROX काढुन गाडीत ठेवली.
पण काहिहि असो लोकांना शिस्त शिकवन्याचा प्रयत्न करत,ऊणवारा पाऊस खात,रस्त्यावर धुर ओकत जानार्या गाड्यांचि आणि आपल्या शरिराचि पर्वा न करता स्वतः गर्दीला तोंड देत दुसर्याला वाट मोकळी करुन देणारा हा " मामा.." एक वेगळाच आहे.
Sunday, June 5, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment