४.फेब्रुवारी.१९२२ - २८.जानेवारी.२०११
पंडित भीमसेन जोशी म्हणजे संगीतविश्वाचा स्वरभास्कर.
भारतीय संगीताचा मानदंड !
संगीताच्या सुरेल दुनियेचा नाद - सागर.
जवळजवळ चार तपं कोट्यवधी रसिकांना मुग्ध करणारा चिरयौवन स्वर !
या गंधर्वकंठातला ऐक नितळ, निकोप स्वर म्हणजे सजीव भावशिल्प.
पंडितजींच्या स्वराला स्पर्श आहे
भगवान श्रीकृष्णांच्या वेणूचा आणि नारदांच्या वीणेचा.
शास्त्रीय संगीतातील त्यांची कलाकुसर अशी की
नामवंत शिल्पांनीही लाजावं, चांदण्यांनी हळुवार व्हावं.
आलापीची अमृतवेल गुंफणारी अजोड ख्याल गायकी ...
शृंगारात फुललेली सलज्ज ठुमरी ....
भक्ती आणि करुण रसांचा परमोत्कर्ष साधणारी
नादस्वरात चिंब भिजलेली संतवाणी...
आणि सुगम संगीतातील विलोभनीय सुबद्धता...
ही चतुरस्त्र अनुपमेय !
गानरसिकांच्या हृदयसिंहासनावरील अनभिषिक्त गानसम्राट म्हणजे
पं. भीमसेन जोशी
Tuesday, February 15, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment